पनामा पेपर्स घोटाळ्यापाठोपाठ आता ‘पॅराडाइज पेपर्स’ घोटाळा उघडकीस आला आहे. याद्वारे करचोरी आणि काळ्या पैशांचे पांढ-यामध्ये होणारे रुपांतर पुन्हा एकदा उजेडात आले आहे. काही बोगस कंपन्या आणि फर्म जगभरातील श्रीमंतांचा काळा पैसा विदेशात पाठविण्यास मदत करत असल्याचे या घोटाळ्यातून उघड झाले आहे. या घोटाळ्यात अमेरिका, ब्रिटन, कॅनडामधील अनेक बड्या नावांचा समावेश असून अभिनेते, राजकारणी आणि उद्योगपतींसह 714 भारतीयांचा समावेश असल्याची धक्कादायक माहितीही उघड झाली आहे. हा घोटाळा उघड करण्यासाठी 1.34 कोटी दस्तावेजांची छाननी करण्यात आली आहे. जर्मनीच्या ‘जिटॉयचे सायटूंग’ या वर्तमानपत्राने हा घोटाळा उघड केला आहे. 96 मीडिया ऑर्गनायझेशनच्या मदतीने इंटरनॅशनल कॉन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टने (आयसीआयजे) पॅरेडाइज पेपर्स नावाच्या दस्तावेजांची छाननी केली. हे एकूण 1.34 कोटी दस्तावेज आहेत. विशेष म्हणजे 18 महिन्यांपूर्वी ‘जि, टॉयचे सायटूंग’नेच पनामा घोटाळा उघड केला होता.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews